राज्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस वर्तवण्यात आलेला आहे व त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतो अशा स्थितीमध्ये उन्हाळी शेती पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली दिसते. अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे.
तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे व त्यामुळे पावसाची शक्यता अजूनही असल्याने पाऊस आल्यास नुकसान बाधित क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे, अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलेले असून शेती पिके भुईसपाट झालेली दिसतात.
जळगाव – 3984 हेक्टर, बीड – 1020 हेक्टर, नांदेड – 748 हेक्टर, वर्धा – 527 हेक्टर, छत्रपती संभाजीनगर – 163 हेक्टर, धाराशिव – 308 हेक्टर, जालना – 133.3 हेक्टर, हिंगोली – 297 हेक्टर, लातूर – 160.2 हेक्टर अशाप्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे क्षेत्र बाधित झालेले आहे व त्यामध्ये सर्वात मोठे क्षेत्र जळगाव जिल्ह्याचे बाधित झालेले आहे.
तीन दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील 7500 हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेलेला आहे व त्यामुळे आपल्याला अर्थातच लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झालेले असून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीला सुद्धा सामोरे जावे लागलेले आहे.