अवकाळी पावसामुळे या 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान | Avkali Paus 

राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विविध भागात पावसाने हजेरी लावलेली आहे व अवकाळी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परंतु अशा स्थितीमध्ये शेतकरी मात्र हवालदिल झालेला दिसतो.

 

राज्यातील वर्धा जळगाव व अमरावती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये, टरबूज, तीळ आणि लिंबू अशा प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने व वाऱ्यामुळे नुकसान झालेले दिसते.

 

अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती अवकाळी पावसाने ओढवलेली आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये तर अवकाळी पावसासह गारपीट सुद्धा बघायला मिळाली व त्यामुळे संत्रा, गहू व कांदा सारखी पिके मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे.

 

वर्धा व अमरावती जिल्ह्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला परंतु यामध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे पाऊस आल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये आनंद सुद्धा बघायला मिळाला परंतु शेती पिकाचे झालेले नुकसान बघून शेतकऱ्यांअंतर्गत नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी केली जात आहे.

 

बांधकाम कामगारांना मिळणार अशा पद्धतीने 1 लाख रुपये, तुम्ही नोंदणी केलीत का? 

Leave a Comment