राज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात बांधकाम कामगारांना एक लाख रुपये मिळू शकणार आहे, या योजनेअंतर्गत तुम्ही पात्र असल्यास नोंदणी करू शकतात तसेच एक लाख रुपये या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळू शकणार आहे. त्यामुळे जाणून घेऊया तुम्ही योजनेअंतर्गत पात्र आहात की नाही?
ज्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे अशांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येतो तसेच मागील काही दिवसांपूर्वी भांड्याच्या संचासाठी अर्ज सुरू करण्यात आलेले होते, व त्यामध्ये लाखो नागरिकांनी म्हणजेच बांधकाम कामगारांनी अर्ज केलेलेआहेत, अशाच प्रकारे बांधकाम कामगारांना एक लाख रुपये मिळणार आहे.
बांधकाम कामगार कुटुंब नियोजन योजना
बांधकाम कामगार कुटुंब नियोजन योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जातील त्याकरिता मात्र नोंदणीकृत असणे गरजेचे असून एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यास मुलीच्या नावाने अठरा वर्षेपर्यंत मुदत ठेव म्हणून 1 लाख रुपये दिले जातील. यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र सुद्धा असावे.
योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यावा?
अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, तुम्ही नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम नोंदणी करून घ्या व जेव्हा योजनेअंतर्गत अर्ज चालू होतील अशा वेळेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करता येणार आहे, त्याच वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अर्ज प्रक्रिया करताना विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही, आपले नाव पहा
1 thought on “बांधकाम कामगारांना मिळणार अशा पद्धतीने 1 लाख रुपये, तुम्ही नोंदणी केलीत का? | Bandhakam Kamgar”