महा डीबीटी योजने अंतर्गत आता मिळणार चारा अनुदान, प्रस्ताव जाहीर | Chara Anudan

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पशूचे पालन केले जाते व अशा वेळेस दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पशूसाठी चाऱ्याची टंचाई भासते त्यामुळे हीच चाऱ्यांची टंचाई भासू नये तसेच योग्य दरामध्ये पशुपालकांना चारा उपलब्ध व्हावा याकरिता, डीबीटी च्या माध्यमातून चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला असून, टॅगिंग झालेल्या जनावरांना चारा अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर पशुपालक असाल तुमच्याकडे जर टॅगिंग केलेली जनावरे असतील तर तुम्हाला सुद्धा चारा अनुदान मिळणार आहे. 

 

यावर्षी महाराष्ट्रातील चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे कारण अनेक जण महाराष्ट्रातील चारा इतर राज्यांमध्ये विकत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पशुंसाठी चारा कमी पडू नये, यामुळेच ही चारा वाहतूक बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच यंदा चारा टंचाई पडू नये याकरिता शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून चारा बियाणे सुद्धा पुरवण्यात आलेले होते.

 

राज्यामध्ये चारा पुरवठा दाराकडून कमी चारा जास्त किमतीमध्ये विकला जात आहे, याच प्रकरणाला आळा घालण्याचा उद्देश ठेवून चारा अनुदान राबवले जात आहे तसेच, या माध्यमातून जनावरांसाठी चारा खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे व याकरिता पशुपालकाला अर्थातच शेतकऱ्याला अर्ज रीतसर पद्धतीने करावा लागणार आहे त्यानंतर अनुदान चाऱ्यासाठी मिळेल.

अश्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील पशुपालकांना एका मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे आता हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना चारा घालण्यासाठी अनुदान मिळत आहे.

या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आहे. त्यामुळे नक्कीच राज्यातील जास्तीत जास्त पशुपालक शेतकरी बांधवांना चारा अनुदान मिळणार आहे. ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा अशाच माहितीसाठी वेबसाईटवर भेट देत रहा. चारा अनुदान योजना संदर्भात काही अडचण असल्यास आपण कमेंट करून प्रश्न विचारू शकतात.

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार, कर्जमाफी आणि पिक कर्ज, ही बातमी पहा 

Leave a Comment