शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सध्याच्या स्थितीमध्ये शेतकरी शेतीची मशागत करण्यामध्ये गुंतलेले आहेत कारण अगदी काही दिवसांवर पेरणी येऊन पोहोचलेली आहे जून महिन्यामध्ये शेतकरी पेरणी करतील, परंतु यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे कारण रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक ठरणार आहे कारण शेती पिकावरील खर्च या रासायनिक खताच्या दरात वाढ झाल्याने अर्थातच वाढणार आहे.
खताच्या वाढीव किमतीनुसार 24.24.0 हे खत 1550 रुपयांना मिळत होते परंतु या खतासाठी आता शेतकऱ्यांना 1700 रुपये मोजावे लागणार आहे.10.26.26 हे खत 1470 रूपये एवढ्या किमतीला मिळत होते परंतु आता 1700 रुपये या दरांमध्ये खत मिळेल.20.20.0.13 या खतासाठी 1250 रुपये मोजावे लागत होते परंतु यात वाढ होऊन 1450 रुपये मध्ये खत उपलब्ध होईल. पाचशे रुपयांना मिळणारी सुपर फॉस्फेट ची गोणी आता सहाशे रुपयांना मिळणार.
शेती करत असताना शेतीमध्ये उत्पन्नात वाढ करण्यासाठी रासायनिक खताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे तसेच प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर करतात पण त्यामुळे आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतीवरील खर्चात सुद्धा वाढ एक प्रकारे झालेली आहे यात दिवसेंदिवस शेतीवर होणारे उत्पादन खर्च वाढताना दिसतो परंतु पिकाला भाव मिळत नसल्याने केलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळणे कठीण झालेले आहे. अशाप्रकारे वरील दिलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना खत मिळणार आहे.
कापसाच्या उत्पादनात भरपूर वाढ करण्यासाठी कापूस लागवडीचा योग्य कालावधी कोणता?
1 thought on “खताच्या किमतीत एवढ्या रुपयांची वाढ, बघा खताचे नवीन दर | Chemical fertilizers ”