विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 10 हजार गाईं व म्हशी मिळणारं, प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था चालु करण्याचे उद्दीष्ट | Cow Buffalo Milnar

राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना आता दहा हजार गाय व म्हशी दिल्या जाणार आहे. योजनेअंतर्गत असणारा उद्देश म्हणजेच दूध व्यवसायाला चालना देऊन दूध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून घेणे हा आहे व याच उद्देशाला धरून 10000 गायी म्हशी शेतकऱ्यांना दिल्या जातील.

 

मराठवाडा व विदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये पातळीवर एक सहकारी दूध संस्था चालू करण्यात येणार आहे याच उद्देशाने ही गाय व म्हशी वाटपाचे लक्ष गाठले जात आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रात दुपटीने दुधाचे उत्पादन आहे व विदर्भात व मराठवाड्यात 35 लाख लिटर एवढे प्रतिदिन उत्पादन दुधाचे आहे.

 

राज्यामध्ये जिल्हानुसार दुधाचे किती उत्पादन:

सोलापूर – 15 .35 लाख लिटर, सांगली – 11.55 लाख लिटर, नाशिक – 9.14 लाख लिटर, सातारा – 9.01 लाख लिटर, जळगाव – 4.97 लाख लिटर, धाराशिव – 4.95 लाख लिटर, बीड – 3.70 लाख लिटर, संभाजीनगर – 3.59 लाख लिटर, लातूर – 3.15 लाख लिटर, नांदेड – 3.03 लाख लिटर, धुळे – 2.09 लाख लिटर, अमरावती – 2.08 लाख लिटर, बुलढाणा – 1.87 लाख लिटर,अकोला – 0.98 लाख लिटर, नंदुरबार – 0.95 लाख लिटर, वर्धा – 0.93 लाख लिटर, चंद्रपूर – 0.70 लाख लिटर, रत्नागिरी – 0.69 लाख लिटर, वाशिम – 0.66 लाख लिटर, गडचिरोली – 0.45 लाख लिटर, सिंधुदुर्ग – 0.43 लाख लिटर, जालना – 1.67 लाख लिटर, भंडारा – 1.40 लाख लिटर, परभणी- 1.35 लाख लिटर, यवतमाळ – 1.34 लाख लिटर, पालघर – 1.30 लाख लिटर, ठाणे – 1.29 लाख लिटर, रायगड – 1.01 लाख लिटर, गोंदिया – 1.00 लाख लिटर, हिंगोली – 1.00 लाख लिटर अशाप्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दुधाची उत्पादन होते.

अश्या प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी बांधवांना समृद्ध करण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दूध व्यवसायात यशस्वी होता येणार आहे. ही माहिती महत्वाची असेल तर इतरांना देखील पाठवा.

टोमॅटोची लागवड करण्याचा विचार आहे? भरगोस उत्पादन काढायचे असेल तर याच वाणाची निवड करा

Leave a Comment