देशामध्ये तसेच राज्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठीचे विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी शिकला जावा तो सुशिक्षित व्हावा अशा प्रकारची एक इच्छा अशा प्रकारच्या योजनांमधून पूर्ण केली जाते व अशाच प्रकारची एक योजना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते.
Doctor Babasaheb Ambedkar Swadhar Plan अंतर्गत कोणते विद्यार्थी पात्र ठरणार आहे? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती नेमकी मदत मिळणार किती अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊयात तुम्हाला जर शिक्षण घेत असताना राहण्यासाठीच्या सोयी यासाठी लागणारे पैसे हवे असतील म्हणजेच आर्थिक मदत हवी असेल तर योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
अनेक विद्यार्थी अकरावी बारावी किंवा पदवी असा शिक्षणाकरिता बाहेरगावी राहायला जातात अशा वेळेस होस्टेल किंवा राहण्याची सोय नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो व हा खर्च गरीब पालक आपल्या मुलांसाठी करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ:
- योजनेअंतर्गत लाभ घेत असताना विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ही योजना महाराष्ट्र मध्येच राबवली जाते.
- योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच नव बौद्ध घटकातील विद्यार्थी अर्ज करून लाभ घेण्यास पात्र आहे.
- अपंग विद्यार्थी योजनेसाठी पात्र ठरू शकतात त्यासाठी किमान 50 टक्के एवढे गुण आवश्यक असेल.
- इतर विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी 60 टक्के एवढे गुण असणे गरजेचे असणार आहे यापेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी योजनेस पात्र ठरणार नाही.
- दहावी बारावी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच पदवी व पदवी शिक्षन घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- गुणपत्रिका
- बोनाफाईड
- पत्त्याचा पुरावा
- दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट बघून त्या वेबसाईटला ओपन करून अर्ज प्रक्रियेवर क्लिक करून विचारले गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे विद्यार्थ्याला भरावी लागणार आहेत त्यानंतर वरील दिलेली संपूर्ण कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करावी तसेच पुन्हा एकदा भरलेली माहिती चेक करून अर्ज सबमिट करावा त्यानंतर तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला 51 हजार रुपये एवढी मदत दिली जाईल.
Which is the official website to apply