घरबसल्या मोबाईल वरून काढा ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची संपूर्ण प्रोसेस फॉलो करा | Driving license

आपण बघतो की सगळीकडे आता गाड्यांची गरज भासत आहे अगदी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतःच्या गाडीचा वापर केला जातो परंतु अशा वेळेस मात्र ड्रायव्हिंग लायसन्स चालकाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे कारण ड्रायव्हर जवळ म्हणजे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचे असून ड्रायव्हिंग लायसन नसताना गाडी चालवण्यास मोठा दंड सुद्धा बसू शकतो.

 

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला ते कशा पद्धतीने काढायचे ते आपण जाणून घेऊया पूर्वी मात्र ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असायची व त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहून ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागत होते पण तुम्ही आता ऑनलाइन प्रक्रिया असल्याने अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन पद्धतीने काढता येणार आहे.

 

ड्रायव्हिंग लायसन्स प्रोसेस:

ऑनलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वप्रथम खालील दिलेल्या वेबसाईटवर जावे, https://sarathi.parivahan.gov.in/ त्यानंतर लर्नर लायसन्स मेनू या पर्यायावर क्लिक करून, नवीन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज हे ऑप्शन निवडा, त्यानंतर काही माहिती भरा, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाका.

 

मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी बॉक्समध्ये एंटर करून फी अपलोड करा, त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट साठी एक प्रकारची तारीख निवडा, त्यानंतर संबंधित तारखे वर तुम्हाला आरटीओला भेट द्यावी लागेल संबंधित कागदपत्रे तसेच त्या ठिकाणी तुमची चाचणी घेतली जाईल व त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची दुसरी पद्धत:

प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून म्हणजेच परिवहन विभागाच्या माध्यमातून कॅम्प आयोजित करण्यात येत असतात. या कॅम्पमध्ये तुम्हाला लायसन काढण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. तुम्ही या कॅम्प मध् जाऊन तुमचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात तसेच अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल. तसेच जे काही अर्जाचे शुल्क असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागेल. त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही सर्व बाबींमध्ये योग्य ठरला तर तुमच्या घरी पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून लायसन्स पाठवण्यात येईल.

अशा पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स परवाना करण्याच्या या दोन पद्धती आहेत. त्यापैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचा परवाना काढू शकता.

शेतकऱ्यांना मिळणार टू व्हीलर तसेच थ्री व्हीलर साठी 2 लाखांचे कर्ज, बघा काय आहे प्रोसेस? 

2 thoughts on “घरबसल्या मोबाईल वरून काढा ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची संपूर्ण प्रोसेस फॉलो करा | Driving license”

Leave a Comment