2023 मधील दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे काम करावे लागणार, डीबीटी पोर्टलची दुरुस्ती काम सुरू | Drought subsidy

खरीप हंगाम 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाने खंड पडलेला होता मोठ्या प्रमाणात पावसाची गरज शेती पिकांना होती परंतु पावसाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात पीके करपून गेलेली होती व अशा स्थितीमध्ये राज्य शासना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता.

 

अशाच शेतकऱ्यांना आता दुष्काळी अनुदानाचे वाटप केले जाणार आहे कारण शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत मिळणे अपेक्षित होते व त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी काय करावे लागणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, तसेच डीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात याद्या सुद्धा पाठवल्या जात आहे अशा प्रकारची संपूर्ण कामे चालू झालेली आहे.

 

परंतु यादीत नाव असून सुधा अनेक शेतकरी बांधवांनी kyc केली नाही.

 

शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम केवायसी करून घेणे गरजेचे आहे कारण की पैसे KYC केल्या शिवाय दुष्काळी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस केवायसी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पूर्ण करावी त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे वितरण केले जाणार आहे.

Kyc कुणी करावी?

ज्या शेतकरी बांधवांची नावे दुष्काळी अनुदान यादीत आलेली आहे, अशा शेतकरी बांधवांनी kyc करायची आहे. ही दुष्काळी अनुदान यादी तुम्हाला जवळच्या csc सेंटर वर मिळेल.

मतदार यादीत आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव चेक करा, बघा संपूर्ण प्रोसेस

Leave a Comment