दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करणे कठीण झालेले होते, त्यामध्ये दुधाला मिळत नसलेला चांगला तर हे मुख्य कारण होते परंतु यावर राज्य शासनांतर्गत एक मुख्य तोडगा काढण्यात आलेला आहे व त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर याप्रमाणे दूध अनुदानाचा लाभ दिला जातो राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या दूध अनुदानासाठी पात्र ठरलेले आहे व आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम सुद्धा दूध अनुदानाची जमा करण्यात आलेली आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हे एका महिन्याऐवजी दोन महिन्याचे करण्यात आलेले आहे अर्थातच आता शेतकऱ्यांना एक जानेवारी 2024 ते दहा मार्च 2024 या कालावधीमध्ये दूध अनुदानाचा प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे लाभ दिला जाईल व दूध अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जात आहे व त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात एवढ्या कोटींची रक्कम जमा
महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी जानेवारी 2024 मध्ये घोषणा करण्यात आलेली होती व त्यानुसार खाजगी दूध प्रकल्पांना तसेच सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जाईल अशी घोषणा करण्यात आलेली होती. राज्यातील दूध अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 72 हजार एवढी आहे व दूध अनुदान प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे या शेतकऱ्यांच्या खात्यावर 176 कोटी 92 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेले आहे.
सर्वसामान्यांना मिळणार 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार, आत्ताच मोफत गोल्डन कार्ड काढा