राज्य शासन अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार शाळांमध्ये भरलेली विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश होणार आहे तसेच परीक्षा फी कोणत्या विद्यार्थ्यांना परत मिळणार यासाठी विद्यार्थ्यांना कागदपत्रे जमा करावी लागणार आहे ती कुठे व कोणकोणती करायची अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या निर्णयामुळे मात्र विद्यार्थ्यांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्यामध्ये यावर्षी दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती तर काही भागांमध्ये दुष्काळ सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे व राज्यातील 40 तालुक्यांमध्ये व त्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळात दृश्य परिस्थिती असल्याने या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी मध्ये भरलेली परीक्षा फी परत केली जाणार आहे. कारण दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी वापस मिळणे हे गरजेचे आहे.
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी चा लाभ मिळणार असून महाविद्यालयांने तसेच विद्यापीठाने उच्च शिक्षण विभागाकडे माहिती पाठवलेली आहे, शासनाच्या माध्यमातून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती परत करण्यासाठी बोर्डाला निधी दिलेला आहे परंतु तो निधी कमी पडत असून अजूनही त्या निधीमध्ये 28 कोटी रुपयांची आवश्यकता भासलेली आहे.
ही कागदपत्रे कॉलेज किंवा शाळांमध्ये जमा करावी लागणार
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळवायची असेल तर त्यांना एक महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया करावी लागणार आहे ती प्रक्रिया म्हणजेच बँक पासबुक, आधार कार्ड अशा प्रकारची काही कागदपत्रे आपल्या कॉलेज अथवा शाळांमध्ये नेऊन जमा करावयाची आहे.
विद्यार्थ्यांना त्यांची फी शासन अनुदान म्हणून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करणार आहे. त्या करिता तुम्हाला वरील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
या संदर्भात विस्तृत माहिती तुम्हाला संबंधित शाळा मध्ये मिळणार आहे. त्या ठिकाणीं भेट देऊन संबंधित माहिती विचारू शकतात.