महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, परंतु कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या पिकांवर तोटा सहन करावा लागत आहे कारण कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांना चांगला दर मिळत नाही आहे व हा दर हंगामाच्या सुरुवातीपासूनच नीचांक पातळी गाठूनअसल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्याच नीचांक पातळीमध्ये म्हणजेच अत्यंत कमी दरामध्ये कापूस व सोयाबीनची विक्री केलेली आहे.
अशा परिस्थितीमध्ये अत्यंत कमी दरामध्ये सोयाबीन व कापसाची विक्री करावी लागल्याने शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत मिळणे अपेक्षित होते व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांना म्हणजेच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार होती परंतु ही आर्थिक मदत आता आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना दिली जाईल.
एकूण मिळणारी शेतकऱ्यांना रक्कम 4000 कोटी रुपयांची असून, त्यामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे, त्यामुळे कापूस सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना एक प्रकारची चांगली मदत होईल,व कापूस सोयाबीनच्या दरात वाढ न होण्याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय देशांमध्ये होत असलेले वाद विवाद अर्थातच युद्ध असे सांगण्यात आलेले आहे.
आंतरराष्ट्रीय देशांमध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे कापसावर निर्बंध घालण्यात आलेल्या असून, याचा प्रभाव शेती पिकांच्या मालावर पडलेला आहे व आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा प्रभाव देशातील बाजारामध्ये पडलेला असून कापूस व सोयाबीन दरामध्ये वाढ होत नाही आहे, व त्यामुळे अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकांची विक्री करावी लागत आहे.
1 thought on “आचारसंहिता संपल्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 4000 कोटी रुपये, देवेंद्र फडणवीस यांची माहिती | Farmer Information”