देशामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलाच्या योजना राबवल्या जातात तसेच राज्यांमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात या योजना अंतर्गत देशातील गोरगरीब नागरिकांना यांची पक्की घरे नाही अशांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ दिला जातो व तुम्हाला जर योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर घरकुल लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण घरकुल लाभार्थी यादी कशी चेक करायची याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे बघूया.
शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना घरकुलासाठीच्या राबवल्या जातात देशांमध्ये अनेक असे नागरिक आहे की ज्यांची पक्के घर नाही अगदी मातीच्या कुडाच्या घरामध्ये त्यांना वास्तव्य करावे लागत आहे अशा परिस्थितीमध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांची यादी आपण बघूयात.
मोबाईल वरून घरकुल लाभार्थी यादी चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस
घरकुल लाभार्थी यादी चेक करण्यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम मध्ये जावे, त्यानंतर अधिकृत वेबसाईट ओपन करावी.
त्यानंतर अगदी सहजरित्या पाच ते सहा प्रश्न म्हणजे तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव, ग्रामपंचायत अशा प्रकारची संपूर्ण माहिती विचारली जाईल त्यातील योग्य ऑप्शन निवडून संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी.
त्यानंतर तुम्हाला कोणत्या घरकुल योजनेअंतर्गत यादी बघायची आहे कोणत्या वर्षीची यादी बघायची आहे हे सुद्धा भरा. त्यानंतर कॅपच्या कोड दिला जाईल तो कॅपच्या कोड जशास तसा कॅपच्या कोड बॉक्समध्ये टाकावा.
संपूर्ण वरील माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा व त्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये यादी चेक करता येणार आहे, त्यामध्ये तुमचे नाव असेल तर अर्थातच तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत पात्र ठरलेले असाल. तसेच यादी डाऊनलोड सुद्धा करता येईल.