सर्वसामान्यांना मिळणार 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार, आत्ताच मोफत गोल्डन कार्ड काढा | Golden card

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी गोल्डन कार्ड काढावे लागणार आहे म्हणजेच पाच लाख पर्यंतचा मोफत उपचार मिळणे शक्य होईल, या योजनेचे नाव आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना हे आहे, या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो कारण विविध प्रकारचे आजार वर झाल्यास या गोल्डन कार्ड अंतर्गत पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार मिळू शकतो.

 

योजनेअंतर्गत केशरी रेशन कार्डधारक नागरिक गोल्डन कार्ड काढून योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे, पिवळे रेशन कार्ड धारक व अंतोदय रेशन कार्ड, अन्नपूर्णा योजनेतील रेशन कार्डधारक योजनेअंतर्गत पात्र ठेरु शकतात, शासकीय महिला आश्रम तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी सुद्धा योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहे.

 

योजनेचा सध्याच्या स्थितीचा आढावा घ्यायचा झाल्यास किती नागरिकांनी कार्ड काढलेले आहेत तसेच इतरही माहिती बघूयात, एकूण लाभार्थ्यांची संख्या 23 लाख 47 हजार 555 एवढी आहे, व आतापर्यंत.10.30 लाख नागरिकांनी कार्ड काढलेले आहेत. योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या आजारांची संख्या 1365 एवढी असून, यासाठी चे एकूण रुग्णालयांची संख्या 51 एवढी आहे.

 

जन आरोग्य योजना कार्ड कसे काढावे?

मित्रांनो जर तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार मिळवायचा असेल तर तुम्ही राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ मिळू शकतात, किंवा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकतात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे जन आरोग्य योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे. हे काढ तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन काढू शकता.

 

केंद्र शासनाच्या मार्फत देशातील अनेक गरीब नागरिकांना हे कार्ड पुरवण्यात आलेले असून अनेक लोकांचे नावे त्या यादीमध्ये आहे परंतु त्यांनी अजून देखील कार्ड बनवले नाही त्यामुळे त्यांचे नाव सर्वप्रथम तुम्हाला चेक करावे लागेल त्याकरिता जवळच्या सीएसटी सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचे नाव चेक करा त्यानंतर तुम्हाला कार्ड प्रिंट करून देण्यात येईल.

 

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही कार्ड असण्याची आवश्यकता नाही तुम्ही रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन जाऊन अंतर्गत लाभ मिळू शकतात. ज्या दवाखान्यामध्ये तुम्ही उपचार देत आहात त्या ठिकाणी आरोग्य मित्र असतो त्यांना भेटून तुम्ही योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतात.

 

या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही, आपले नाव पहा 

Leave a Comment