देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे व अशाच शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात व या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे हित साधले जावे आर्थिक दिलासा मिळावा हाच असतो, व अशाच प्रकारच्या दोन योजना आहेत त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी नक्कीच घ्यायला हवा कारण या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत व यामध्ये नक्की शेतकऱ्यांची फायदा होणार आहे.
पी एम किसान योजना:
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत पीएम किसान योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते एकूण तीन हप्ते वर्षातून दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे शेतकऱ्यांना दिला जातो व आतापर्यंत 16 हप्त्यांची वितरण पीएम किसान योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यासाठी योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना:
पिक विमा योजना दरवर्षी विविध पिकांसाठीचा राबविला जातो, आणि आपल्याला माहीतच आहे की शेती करत असताना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटे दुष्काळ परिस्थिती अशा प्रकारे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते अशावेळी शेती पिकाचे नुकसान झाले असता शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत पिक विमा योजनेअंतर्गत मिळू शकते. त्यामुळे पिक विमा काढून शेतकऱ्याला एक प्रकारची पिकाची हमी दिली जाते. दरवर्षी विविध पिकांसाठी पीक विमा काढून योजनेअंतर्गत लाभ शेतकऱ्याला घेता येतो.
वरील दोन्ही योजना केंद्र सरकार राबवीत असून या योजेअंतर्गत अर्ज करणेसाठी आपण csc सेंटर वर जाऊन अर्ज करू शकतात. वरील दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत.
आता शेतकरी सुद्धा बनणार करोडपती, फक्त करावी लागेल या पिकांची ‘शेती’ संपूर्ण माहिती पहा