शेत जमिनीची खरेदी करण्याचा विचार आहे? थांबा! जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी | Jamin Kharedi

दिवसेंदिवस शेतीचे महत्व वाढत चाललेले आहे, त्यामुळे एक प्रकारची गुंतवणूक म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून शेतीची खरेदी केली जाते परंतु शेत जमीन खरेदी करताना काही गोष्टींची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असते जेणेकरून भविष्यामध्ये पस्तावण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. शेत जमिनी खरेदी विक्री करत असताना मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्या जाते व ही फसवणूक टाळण्यासाठी खालील बाबी विचारात घेऊन जमिनीची खरेदी करावी.

 

जमीन खरेदी करत असताना सर्वप्रथम जमिनीचा नकाशा लक्षात घेणे गरजेचे आहे त्यातील सीमा लक्षात घ्याव्यात तसेच, शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता कोण्या ठिकाणी आहे किंवा रस्ता आहे की नाही हे देखील नकाशावरून समजेल व त्यामुळे भविष्यामध्ये रस्ता नसल्याच्या अडचणीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागणार नाही.

 

जमीन खरेदी करत असताना सर्वात महत्त्वाची कागदपत्र म्हणजेच सातबारा व फेरफार होय, याची तपासणी करणे अत्यंत महत्त्वपूर्ण असते कारण जमिनीच्या सीमा तसेच जमिनीवरील हक्क मालक कोण आहे यापूर्वी कोणाच्या नावे होती अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला यावरून मिळू शकते.

 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जे जमीन खरेदी करत आहात त्या जमिनीवर एखाद्या संस्थेचा अथवा एखाद्या बँकेचा बोजा आहे का हे लक्षात घेणे गरजेचे आहे कारण नंतर मात्र छोट्या छोट्या चुकांमुळे शेत जमीन खरेदी करणाऱ्याला मोठा दंड बसण्याची शक्यता असते. अशाप्रकारे वरील दिलेल्या संपूर्ण बाबी लक्षात घेऊनच नवीन जमिनीची खरेदी करावी.

 

बांधकाम कामगारांना मिळणार अशा पद्धतीने 1 लाख रुपये, तुम्ही नोंदणी केलीत का? 

2 thoughts on “शेत जमिनीची खरेदी करण्याचा विचार आहे? थांबा! जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी | Jamin Kharedi”

Leave a Comment