कांदा चाळीसाठी शंभर टक्के अनुदान, आत्ताच अर्ज करा | Kanda Chal

संपूर्ण देशामध्ये विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजेच कांदा चाळ अनुदान योजना होय, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कांद्याची साठवून करण्यासाठी कांदा चाळ यासाठी शंभर टक्के एवढे अनुदान दिले जाते.

 

कांद्याची काढणी केल्यानंतर कांदा सुकल्यानंतर शेतकऱ्याला कांद्याची साठवणूक करून ठेवता आली पाहिजे यासाठी कांदा चाळ अनुदान योजना राबवली जाते, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याची काढणी केली जाते त्यावेळी बाजारांमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दरात उतार पातळी गाठली जाते त्यामुळे शेतकऱ्याला अत्यंत कमी दरात कांद्याची

विक्री करावी लागते.

 

त्यामुळे शेतकऱ्याला कांदा जमा करून ठेवण्यासाठी एखादी जागा असणे गरजेचे आहे व ती जागा म्हणजेच कांदा चाळ, कांदा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला जाऊ शकतो व ज्यावेळेस कांद्याचे दर वाढतील अशा वेळेस शेतकऱ्याला कांद्याची विक्री करून आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे मिळवता येऊ शकतो.

 

कांदा चाळ अर्ज

 

कांदा चाळ शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे.

 

त्यानंतर नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करावी लागणार आहे, नोंदणी करताना विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे अर्जदाराला भरावी लागेल. त्यानंतर काही माहिती भरून लॉगिन करावे लागेल आवश्यक मागितलेली आधार कार्ड कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा. अशाप्रकारे शंभर टक्के अनुदान कांदा चाळीसाठी मिळवण्या करिता अर्ज करावा लागतो.

कांदा चाळ अनुदान अर्ज वेबसाईट

मिनी राईस मिल योजनेअंतर्गत मिळणार 2 लाखांचे अनुदान, आत्ताच अर्ज करा

Leave a Comment