पुढील महिन्यात कापसाचे भाव 10 हजार वर जाणार का? जाणून घ्या दर | Kapus Bajarbhav

कापसाच्या दरामध्ये आत्तापर्यंत चढ उतार चालूच आहे त्यामुळे मे महिन्यामध्ये कापसाला काय दर मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे कारण कापसाचे दर वाढतील या अपेक्षा पोटी अनेक शेतकऱ्यांकडे कापसाची साठवणूक करून ठेवलेली असल्याने कापूस दरात वाढ होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांची आहे व त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये विविध बाजार समितीत कापसाला काय दर मिळतोय कापसाची आवक किती होत आहेत अशा प्रकारची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी जाणून घ्यावयाची आहे.

 

कापसाला अमरावती बाजार समितीमध्ये मिळत असलेला दर 7450 रुपये एवढा आहे, सरासरी दर 7 हजार 225 रुपये एवढा मिळाला, देऊळगाव राजा बाजार समितीत 7 हजार 650 रुपये एवढा दर कापसाला मिळालेला आहे, तसेच सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये एवढा बघायला मिळाला.

 

सात हजार सहाशे दहा रुपये एवढा दर सेलू बाजार समितीमध्ये मिळालेला असून सरासरी दर 7560 रुपये एवढा मिळाला. घाटंजी बाजार समिती सात हजार 450 रुपये एवढा तर सरासरी दर 7300 रुपये एवढा मिळालेला आहे. फुलंब्री बाजार समिती 7 हजार 900 रुपये एवढा दर कापसाला असून सर्वसाधारण दर 7 हजार नऊशे रुपये एवढाच आहे.

 

अशाप्रकारे विविध बाजार समितीमध्ये कापसाला वरील प्रमाणे दर मिळताना दिसतो त्यामुळे मे महिन्यामध्ये कापसाचा दर वाढणार का हा प्रश्न शेतकऱ्यांकडे उपस्थित झालेला आहे व अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाचा दर वाढू शकतो अशा प्रकारची शक्यता आहे व त्यानुसार कापूस विक्रीचे शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे.

 

शेतकरी बांधवांनो प्रति महिना 3 हजार पेन्शन मिळणार, श्रम योगी मानधन योजना अंतर्गत करा अर्ज

Leave a Comment