कापसाला मिळतोय या कारणाने हमीभावापेक्षा जास्त दर, कापूस दर 10 हजार रुपयांचा टप्पा गाठणार? | Kapus Dar

कापूस दराबाबत विचार करायचा झाल्यास सध्याच्या स्थितीमध्ये विविध बाजार समितीमध्ये कापूस दर सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान असून काही बाजार समित्यांमध्ये आठ हजार रुपयांचा टप्पा कापूस दराने गाठलेला आहे व याचे मुख्य कारण काय कापूस दर हमीभावापेक्षा जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय परंतु चांगला दर अजूनही वाढणार का? याबाबत माहिती शेतकऱ्यांना माहिती असायला हवी.

 

हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर खूप कमी होते हमीभावापेक्षा कमी दर कापसाला मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती व आता मात्र आठ हजार रुपयांचा टप्पा कापूस दराने गाठलेला आहे अर्थातच हमीभावापेक्षा चांगला दर कापसाला मिळत आहे.

पुढे कसा राहील बाजारभाव?

केंद्र सरकारच्या माहितीनुसार यावर्षी कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या कापूस उत्पादनापेक्षा कमी आहे व त्याच कारणे कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळताना दिसतो तसेच अभ्यासकांच्या मते कापूस दर हे पुढील काही दिवसांमध्ये दहा हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता व एक प्रकारची आशा व्यक्त केलेली आहे व त्यामुळे ज्यांनी कापसाची साठवणूक केलेली आहे, त्यांच्या साठी एक समाधान पूर्वक बातमी आहे.

 

कापसाचे पीक घेत असताना मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते व सध्याच्या स्थितीमध्ये मजुरांची टंचाई असल्याने रोज किंवा मजुरी वाढवून शेतकऱ्यांना मजुरांना कामाला लावावे लागते व अशा स्थितीमध्ये दिवसेंदिवस शेतीवर होणारा खर्च वाढत चाललेला आहे परंतु कापसाला चांगला दर मिळाला नाही तर शेतकरी मात्र कापूस उत्पादन घेऊन घाट्यात राहिलेले आहे.

 

अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच कापूस तर हमीभाव पेक्षा जास्त मिळत आहे व याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन कमी झालेले आहे.

 

घरावर सोलर पॅनल बसवून वीज बीलापासून सुटका मिळवा, मिळणार 78 हजार रुपयांचे अनुदान, संपूर्ण माहिती 

Leave a Comment