राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते परंतु या वर्षीचा विचार करायचा झाल्यास हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळत नाहीये, हंगामाची सुरुवात अगदी हमीभावापेक्षा कमी दराने झालेली होती व त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण सुद्धा बघायला मिळालेले असून अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली होती.
गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर थोड्या प्रमाणात सुधारले दिसते व कापूरदाराचा विचार करायचा झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस वायद्याची स्थिती सुधारलेली आहे व याचाच परिणाम देशातील कापूस फायद्यावर झालेला असून, देशातील कापूस वायदे 460 रुपयांनी वाढलेले आहे.
वायद्यामध्ये जरी सुधारणा झालेली असली तरी कापूस दरावर मात्र याचा काहीही परिणाम झालेला नाही कापसाचे दर जास्त वाढलेले नाही, देशामध्ये 7200 ते 7600 रुपये एवढा दर कापसाला सर्वसाधारण मिळताना दिसतो. त्यामुळे अशा प्रकारची कापसाची स्थिती येत्या काळामध्ये सुद्धा राहू शकते अशा प्रकारचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे.
शेतकऱ्यांना मिळणार मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत 4 लाखांचे अनुदान, लाभ घेण्यासाठी आत्ताच अर्ज करा