मागील काही दिवसांमध्ये कापसाचे दर वाढलेले होते परंतु गेल्या तीन ते चार दिवसात थोड्या प्रमाणात घसरण बघायला मिळालेली होती परंतु बाजार समितीमध्ये आठ हजार रुपयांचा दर कापसाला आज मिळालेला आहे त्यामुळे कोणत्या बाजार समितीमध्ये आठ हजार रुपयांचा दर मिळाला तसेच राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला काय दर मिळतोय कापसाची आवक किती होते? अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघूयात.
महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते परंतु यावर्षी मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळत नाहीये तर काही दिवसांपूर्वी मात्र हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर कापसाला मिळत होता व अशा स्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली आहे परंतु आता कापसाच्या दराने थोडीशी मान वर काढलेली आहे.
कापुस दर
राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपयांचा दर मिळाला हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल, फुलंब्री बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये एवढा दर मिळालेला आहे तर त्याच बाजार समितीमध्ये कापसाची आवक 104 क्विंटल एवढी होती. वर्धा बाजार समितीत 7500 रुपये एवढा दर कापसाला मिळालेला आहे तर त्याच बाजार समितीमध्ये 7200 रुपये एवढा सरासरी दर होता. 375 क्विंटल एवढी आवक कापसाची झालेली होती.
आकोट बाजार समितीत 7100 एवढा दर कापसाला मिळालेला आहे तर 7050 रुपये एवढा सरासरी दर होता. कापसाची आवक 35 क्विंटल एवढी होती. 7350 रुपये एवढा दर उमरेड बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला तर त्या ठिकाणी सरासरी 7150 रूपये एवढा दर होता. अमरावती बाजार समितीमध्ये 7350 रुपये एवढा दर मिळालेला आहे.
अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला वरील प्रमाणे दर मिळताना दिसतो व हा दर हंगामाच्या सुरुवातीला असलेल्या दरापेक्षा अर्थातच चांगला मिळतोय कारण पूर्वी मात्र हमीभावापेक्षा सुद्धा दर कमी मिळालेला आहे. अशाप्रकारे फुलंब्री बाजार समितीत 8 हजार रुपये एवढा दर कापसाला मिळाला.
टोमॅटोची लागवड करण्याचा विचार आहे? भरगोस उत्पादन काढायचे असेल तर याच वाणाची निवड करा