कापसाच्या उत्पादनात भरपूर वाढ करण्यासाठी कापूस लागवडीचा योग्य कालावधी कोणता? | Kapus Lagavad

महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतल्या जाते परंतु दिवसेंदिवस शेती पिकावर होणारा खर्च वाढत चाललेला आहे व त्या प्रमाणामध्ये उत्पादन मात्र खूप कमी होताना दिसते अशा वेळेस कापूसच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य कालावधीमध्ये कापूस पिकाची लागवड करणे गरजेचे आहे त्यावरच पुढील काही क्रिया म्हणजेच बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळला जाऊ शकतो.

 

महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील शेतकरी कापसाची लागवड 20 एप्रिल ते 20 मे या तारखे दरम्यान किंवा या कालावधीमध्ये करतात परंतु या कालावधीमध्ये लागवड न करता तज्ञांच्या मते मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कापूस लागवडीस सुरुवात करावी, कारण तज्ञांच्या मते तापमान कमी राहिले असता कापसाच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते.

 

तसेच अभ्यासकांच्या मते कापूस लागवडीचा उत्तम कालावधी हा 15 जून ते जून चा शेवटचा आठवडा हा समजला जातो कारण या कालावधीमध्ये पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असते त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे याच कालावधीमध्ये शक्यतो शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करावी त्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते. अशाप्रकारे कापूस लागवडीचा योग्य कालावधी वरील प्रमाणे ठरू शकतो.

अशाप्रकारे तुम्ही जर मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, कारण कोणतेही पीक घेत असताना लागवडीचा कालावधी अत्यंत चांगल्या प्रकारे लक्षात घेऊनच पिकाची लागवड करावी लागते कारण कालावधीनुसार सुद्धा उत्पन्नात भर पडू शकते. तुम्ही जर कापूस लागवड करत असाल तर वरिल दिलेल्या तारखांच्या दरम्यानच कापसाची लागवड करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक किंवा उत्पादनात भर पाडण्या लायक ठरणार आहे.

सोयाबीनला काय दर मिळतोय? विविध बाजार समितीतील आजचे सोयाबीन दर 

2 thoughts on “कापसाच्या उत्पादनात भरपूर वाढ करण्यासाठी कापूस लागवडीचा योग्य कालावधी कोणता? | Kapus Lagavad”

Leave a Comment