दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार, कर्जमाफी आणि पिक कर्ज, ही बातमी पहा | Karj mafi pik karj

2023 या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असल्याने शेतकऱ्यांवर एक बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे व अशा परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती शासनाच्या माध्यमातून दिल्या जात आहे व त्या सवलती देखील एक सवलत म्हणजेच कर्जावर सवलत देऊन पुनर्गठनचा मार्ग शेतकऱ्यांपूर्वी ठेवला जात आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, जे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकणार नाही अशा शेतकऱ्यांनी कर्जावर सवलत घेऊन पुनर्गठन मार्ग निवडावा. शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पीक कर्ज उचलतात व अशा स्थितीमध्ये जर शेतीमध्ये नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती या कारणाने मोठे नुकसान होते व अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपले कर्ज फेडू शकत नाही.

 

कर्जाचे पुनर्गठन करण्याचा मार्ग निवडणे गरजेचे आहे, यामध्ये दीर्घकालीन हप्त्यामध्ये परतफेडीचा मार्ग शेतकऱ्यांना दिला जातो, लाभ घ्यायचा असेल तर संबंधित बँकेमध्ये संपर्क साधावा लागणार आहे तसेच आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये आधार कार्ड, पीक नुकसानीचा दाखला, जमीन मालकीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील.

 

संपूर्ण कागदपत्रे तसेच अर्ज संबंधित बँकेमध्ये जाऊन जमा करावा लागणार आहे, त्यानंतर शेतकऱ्याला कर्जाच्या पुनर्गठनाचा मार्ग मोकळा होईल अशा प्रकारची एक उत्तम सवलत शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ची देण्यात आलेली आहे या अंतर्गत शेतकरी लाभ घेऊ शकतात.

 

शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्त्वपूर्ण अंदाज, यावर्षी पाऊस कसा राहणार? बघा संपूर्ण माहिती 

1 thought on “दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार, कर्जमाफी आणि पिक कर्ज, ही बातमी पहा | Karj mafi pik karj”

Leave a Comment