किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे? या वर्षी शेतकऱ्यांना कर्ज मिळणार? | KCC Card Loan Scheme

KCC Card Loan Scheme: शेतकऱ्यांची शेतीची कामे चालू झालेली आहे म्हणजे पेरणीसाठी शेतीची तयारी म्हणजेच मशागत अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे अशा स्थितीमध्ये शेतीतून पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता भासते व त्यामुळे शेतकरी कर्जाचा मार्ग अवलंबतात परंतु कर्ज घेणे शेतकऱ्यांना परवडत नाही कारण कर्जावरील व्याजदर मोठ्या प्रमाणात असतो परंतु आता शेतकऱ्यांना जास्त व्याजदर देण्याची गरज भासणार नाहीये कारण किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे,त्यामुळे यावर्षी किती शेतकऱ्यांना कर्ज मिळणार? तसेच किती लाख कर्ज मिळणार ही माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

केंद्र शासनाने राबवलेली किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून देणे हा आहे, या योजनेच्या माध्यमातून गेल्यावर्षीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ यावर्षी दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर जवळील बँकेमध्ये काही आवश्यक कागदपत्रे जमा करून म्हणजेच जमिनीचे कागदपत्रे व इतर काही कागदपत्रे जमा केल्यानंतर अगदी सहजरीत्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3 लाख रुपयांची कर्ज दिले जाईल.

 

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज घेतल्यानंतर व्याजदर 4 टक्के लावला जाईल परंतु हा व्याजदर मुख्यतः 9 टक्के आहे, परंतु यामध्ये शासनाच्या माध्यमातून दोन टक्के एवढे अनुदान दिले जाते, तसेच रक्कम जमा केल्या शेतकऱ्यांना तीन टक्के एवढी प्रोत्साहन पर अनुदान सुद्धा दिले जाते म्हणजेच एकंदरीत सांगायचे झाल्यास शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जावर 4 टक्के एवढा व्याजदर आकारला जाईल.

 

गेल्या वर्षी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 80000 शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आलेले होते व यामध्ये आता वाढ करून 90 हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे लक्ष पुढे ठेवन्यात आलेले आहे. अशा प्रकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज लाभ मिळवता येणार आहे.

 

बघा खताचे नवीन दर 

Leave a Comment