पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजेच किसान विकास पत्र योजना या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास दुपटीने पैसे मिळणार आहे म्हणजेच जर एखाद्याने चार लाख रुपये ची गुंतवणूक केली तर काही दिवसांनी आठ लाख रुपये मिळेल.
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठीची मर्यादा नसून 1000 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागणार आहे व ती गुंतवणूक तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात करू शकता त्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही जर तुम्ही 5 लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 10 लाख मिळवण्यासाठी 115 महिन्यानंतर दहा लाख रुपये मिळेल.
योजनेअंतर्गत ऑक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये 7.5 टक्के व्याज मिळेल, चक्रवाढ व्याज सुद्धा मिळणार, म्हणजे तुम्ही पाच लाखाची गुंतवणूक केली असता तुम्हाला पाच लाख रुपये एवढे अतिरिक्त व्याज मिळेल अर्थातच दहा लाख रुपये तुमच्या हातात येईल.
अशा प्रकारे जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये अथवा कशामध्ये गुंतवणूक करायचे ठरवत असाल तर पोस्ट ऑफिस ची किसान विकास पत्र योजना खूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
या योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफीस मध्ये संपर्क साधावा लागतो.
घरावर सोलर पॅनल बसवून वीज बीलापासून सुटका मिळवा, मिळणार 78 हजार रुपयांचे अनुदान, संपूर्ण माहिती
2 thoughts on “पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेअंतर्गत मिळणार 4 लाखाचे 8 लाख, म्हणजेच दुप्पट पैसे | Kisan Vikas Patra”