शेतीतील महत्त्वाचा कणा म्हणजे पाण्याची उपलब्धता पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता पाण्याचा स्त्रोत शेतीमध्ये उपलब्ध असणे गरजेचे आहे व त्यामुळे बोर किंवा विहीर शेतीमध्ये उपलब्ध असल्यास सहजरीत्या शेतीला पाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना करता येतो शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला विहीर योजनेच्या अंतर्गत 4 लाख रुपये विहिरीसाठी दिले जातात योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा? अशा प्रकारची संपूर्ण माहिती बघूयात.
योजनेच्या माध्यमातून ज्यांच्या नावावर शेती आहेत म्हणजेच हे शेतकरी अल्पभूधारक आहेत अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ दिला जातो तसेच शेतकऱ्यांच्या नावे पूर्वीची विहीर नसावी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर विहीर नसेल अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल, तसेच महाराष्ट्र पुरती ही योजना मर्यादित असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी योजनेसाठी पात्र ठरू शकणार आहे त्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, सातबारा, आठ अ, रहिवासी दाखला, जॉब कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे अर्जदाराकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे.
अर्ज कुठे व कसा करावा?
तुम्ही एकतर ऑनलाईन अर्ज करू शकतात अथवा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा तुम्हाला मागेल त्याला विहीर मनरेगा अंतर्गत अर्ज करता येईल, वरील संपूर्ण आवश्यक कागदपत्रे अर्ज घेऊन त्यासोबत जोडून जमा करावी तसेच पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्जाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे अर्ज केल्यानंतर तुमची जर निवड करण्यात आली तर विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये विविध टप्प्यानुसार शेतकऱ्याला दिले जातील.
1 मे पासून यांना मोफत रेशन मिळणार नाही? यादीत नाव पहा, नवीन शिधापत्रिका यादी जाहीर
2 thoughts on “शेतकऱ्यांना मिळणार मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत 4 लाखांचे अनुदान, लाभ घेण्यासाठी आत्ताच अर्ज करा | Magel Tyala Vihir Yojana”