तुम्ही मतदान कार्ड काढले का? अगदी काही मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस | Matdan Card

मतदान करताना मतदान कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही अठरा वर्षे पूर्ण झालेले व्यक्ती असाल तर तुम्हाला अगदी सहजरीत्या मतदान कार्ड काढता येणार आहे कारण दिवसेंदिवस ऑनलाईन पद्धतीने कोणतीही प्रक्रिया सुलभ होत चाललेली असल्याने मतदान कार्ड काढण्याची प्रक्रिया सुद्धा खूप सोपी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून एक ॲप डाऊनलोड करून मतदान कार्ड काढता येणार आहे. त्याची संपूर्ण प्रोसेस फॉलो करून तुम्ही मतदान कार्ड काढू शकतात व ती प्रोसेस खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

 

मतदान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस:

मतदान कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन वॉटर हेल्पलाइन हा ॲप इंस्टोल करावा लागेल, ॲप ओपन करावा.

 

त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ॲप मध्ये खाते उघडावे लागणार त्यासाठी मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे, अशा प्रकारची माहिती तुम्हाला विचारली जाईल, अशीच काही माहिती योग्य प्रकारे भरून तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवल्या जाईल तो ओटीपी इंटर करावा.

 

भरलेली माहिती संपूर्ण सबमिट करावे अशा पद्धतीने तुमचे खाते ओपन होईल त्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे, वॉटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर फॉर्म नंबर सहा यावर क्लिक करा व तो अर्ज तुम्हाला पूर्णपणे भरावा लागेल.

 

त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती विचारली जाईल राज्य, जिल्हा, तालुका, गाव, मतदार संघ आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख असे संपूर्ण माहिती योग्य प्रकारे निवडावी लागणार आहे, त्यानंतर थोडे खाली गेले असता तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे ते आजची नावे दिली जाते व किती साईडला अपलोड करावी लागणार आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाईल.

 

तुमचा पासपोर्ट साईज फोटो सुद्धा योग्य साईज नुसार अपलोड करावा लागणार आहे अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे अपलोड करा, त्यानंतर मोबाईल क्रमांक, आडनाव, आधार क्रमांक असे माहिती भरा.

 

त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस विषयी संपूर्ण माहिती विचारली जाईल ती संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामध्ये गावाचे नाव पिन कोड अशा प्रकारची माहिती योग्य प्रकारे भरावी त्यानंतर पुन्हा एकदा चेक करून घ्यावे.

 

त्यानंतर तुम्हाला आपली सही अपलोड करावे लागेल, त्यानंतर जन्म ठिकाण, नाव, जन्म झालेला जिल्हा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागणार आहे व संपूर्ण माहिती एकदा तुम्हाला पुन्हा चेक करण्यासाठी दिली जाईल त्यानंतर चेक करून डण बटन वर क्लिक करा.

Voter app link

अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रेफरन्स आयडी सुद्धा दिला जाईल, अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सहजरीत्या घरबसल्या मतदान कार्ड काढता येईल.

मतदान कार्ड मिळेल घरपोच:

आता तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्या नंतर तुमच्या घरी पोस्ट च्या माध्यमातून तुमचे मतदान कार्ड 1 ते 2 महिन्याचे कालावधीत घरपोच मिळते.

घरकुल योजनेची यादी मोबाईल वरून, बघा संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment