सर्वसामान्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण मिनी राईस मिल योजनेअंतर्गत अनुदानमिनी राईस मिल योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते व या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे व अर्ज केल्यानंतर योग्य लाभार्थ्याची निवड केली जाईल व लाभार्थ्याला, 60 टक्के एवढे अनुदान देण्यात येणार आहे.
मिनी राईस मिल ही एक अन्नप्रक्रिया असून त्या अंतर्गत बाजारामध्ये तांदूळ विक्री करण्यासाठी तांदळावर राईस मिल अंतर्गत प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मिनी राईस मिल योजनेचा लाभ घेता येणार आहे, राज्यातील आठ जिल्ह्यांचा योजनेअंतर्गत समावेश आहे.
मिनी राईस मिल योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 60 टक्के अनुदान म्हणजेच 2 लाख 40 हजार रुपये पर्यंतचे अनुदान देण्यात येईल. योजनेअंतर्गत राज्यातील आठ जिल्ह्यातील शेतकरी तसेच महिला अर्ज करून योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरू शकणार आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधावा व त्या ठिकाणची संपूर्ण माहिती मिळवून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करता येणार आहे व अर्ज केल्यानंतर योग्य लाभार्थ्याची निवड काही दिवसातच केली जाईल.