महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजना चालू करण्यात आलेली आहे, ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली गेलेली असून योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण तीन हफ्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे त्यामुळे पुढील 14 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली असून तुम्हाला नमो शेतकरी चा हप्ता मिळणार का व कधी मिळणार हे बघूयात.
त्यापूर्वी जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्यांचे वितरण केले गेलेले असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळू शकतो तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता तसेच योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता.
शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकत्रित येणार का? जर हा हप्ता एकत्रित आला तर शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण एकूण दोन्ही योजनेचे मिळून 4 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अथवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे या कालावधीमध्ये हप्ता मिळू शकतो व हप्ता वितरित करताना निश्चित अशी तारीख सुद्धा ठरवण्यात येईल
सर्वात जास्त पेरले जाणारे या 3 सोयाबीनच्या जाती, शेतकऱ्यांची पसंती असणाऱ्या या प्रमुख जाती पहा