राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी खरीप हंगाम 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस दुष्काळ परिस्थिती गारपीट इतर नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते परंतु अशा स्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा मिळालेला नाही व त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार की नाही हा प्रश्न मोठा उपस्थित झालेला आहे व यावरच उत्तर देत असताना शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे, अगदी नुकसानी पासूनच शेतकरी पिक विमा च्या प्रतीक्षेमध्ये आहे.
दरवर्षीप्रमाणे खरीप हंगाम 2023 मध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले असताना आतापर्यंत तरी शेतकऱ्यांना पिक नुकसानीचा विमा मिळणे गरजेचे होते परंतु अशा प्रकारची स्थिती सध्याची नाही आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंताजनक वातावरण बघायला मिळत आहे कारण एक प्रकारची पैशाची आर्थिक गरज शेतकऱ्यांना यावेळी मिळणे गरजेचे आहे.
50 टक्के पेक्षा ज्या शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांना विविध भागांमध्ये 25 टक्के एवढी पिक विम्याचे वाटप करण्यात आलेले आहे व अशा शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केलेले होते, तर अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केलेले असताना आणि शेतकऱ्यांचे क्लेम बाद करण्यात आलेले आहे.
तसेच जास्त क्लेम नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात आलेले होती व देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी हे क्लेम चुकीच्या पद्धतीने केलेले असल्याने वीमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेले क्लेम रद्द केलेले आहे व त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार की नाही असे वाटत जरी असले तरी वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाणार आहे.