पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत देशामध्ये 2019 ला पीएम किसान सन्मान निधी योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून वर्षातून सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो प्रत्येक हप्ता हा दोन हजार रुपयांचा असून वर्षातून 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जातात त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाभ नोंदवलेला आहे.
तसेच आतापर्यंत एकूण सोळा हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे व 17 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा शेतकरी करताना दिसतात व त्यामुळे अशाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे अंदाजे मे महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरीत केला जाऊ शकतो परंतु तारीख निश्चित अशी करण्यात आलेली नाही. जर मे महिन्यामध्ये पीएम किसान योजना अंतर्गत 17 वा हप्ता मिळाला नाही तर निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात केंद्र शासन शेतकऱ्यांना 2000 रुपये पी एम किसान गिफ्ट देऊ शकते.
मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले होते कारण खोटी कागदपत्रे बनवून शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत होते परंतु आता एक प्रकारची पारदर्शकता या योजनेमध्ये निर्माण झालेली आहे आधार कार्ड लिंक करणे,ई केवायसी करणे अशा प्रकारच्या प्रक्रिया करून योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकरी घेऊ शकतो.
या वर्षी तुम्हाला किती पिक कर्ज मिळणार? येथे पहा पिक कर्ज वाटपाचे नवीन दर