देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत पीएम किसान योजना चालू करण्यात आलेली आहे आतापर्यंत 16 हप्त्यांचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, तसेच तुमच्या शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करणे गरजेचे आहे नवीन नोंदणी केल्यानंतर त्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम अगदी सहजरीत्या मिळू शकणार आहे, एवढेच नाही तर पीएम किसान ची नोंदणी केल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा 6 हजार रुपये मिळतील म्हणजेच वार्षिक 12000 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्याला मिळणार.
पीएम किसान योजनेची नोंदणी प्रोसेस
- पी एम किसान योजनेची नवीन नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे लागणार आहे.
- अधिकृत संकेतस्थळ ओपन केल्यानंतर विविध पर्यायांपैकी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यातील रहिवासी आहात म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर महाराष्ट्र निवडा त्यानंतर जिल्हा, तालुका वगैरे निवडून मोबाईल क्रमांक भरावा.
- मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविला जाईल तो ओटीपी जशास तसा ओटीपी बॉक्समध्ये टाकावा.
- तसेच कॅपच्या कोड दिला जाईल तो सुद्धा जशास तसा टाका, प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर, भरलेली माहिती योग्य आहे का पुन्हा चेक करा.
- आलेला ओटीपी पुन्हा एकदा ऍड करून जमिनी संबंधित संपूर्ण आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने योग्य साईनुसार अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर कॉम्प्युटर रजिस्ट्रेशन हा मेसेज येईल.
- अशाप्रकारे तुमची पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी पूर्ण होईल. व त्यानंतर तुम्हाला हप्त्याचे वितरण सुरू होईल.
पी एम किसान व नमो शेतकरी चा एकत्रित लाभ:
किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना अतिरिक्त 6000 मिळणार आहे.
नमो शेतकरी योजना चा खर्च राज्य शासन करत आहे. या योजनांचा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसते. पी एम किसान योजना अंतर्गत तुम्हाला लाभ मिळणे सुरू झाले की नमो शेतकरी करिता आपण पात्र ठरतात. त्यामुळे पी एम किसान करिता ऑनलाईन अर्ज करून शेतकरी वार्षिक 12 हजार मिळवू शकतात.
1 मे पासून यांना मोफत रेशन मिळणार नाही? यादीत नाव पहा, नवीन शिधापत्रिका यादी जाहीर