या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही, आपले नाव पहा | pm Kisan Yojana

देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत पी एम किसान योजना राबवली जाते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम जमा केली जाते व याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत सुद्धा नमो शेतकरी योजना राबवली जात आहे व 28 फेब्रुवारी 2024 ला नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनांचे हप्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.

 

आतापर्यंत पीएम किसान योजने अंतर्गत 16 हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे व सतरावा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे परंतु शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार की नाही? कारण अनेक शेतकऱ्यांनी काही अटी व शर्ती पूर्ण केलेल्या नसल्याने शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

 

पीएम किसान योजनेचा हप्ता न मिळण्यामागची कारणे काय?

 

अशी काही कारणे आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळू शकणार नाही ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नसेल अशे शेतकरी सतराव्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी.

 

बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न करून घेणे अत्यंत आवश्यक आहे असे न केल्यास शेतकरी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता प्राप्त करू शकणार नाही, एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी कागदपत्रे सुद्धा योग्य प्रकारे करावी व त्यामध्ये दिलेली माहिती योग्य भरावी व त्यानुसारच दिलेल्या संपूर्ण अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना सतरावा हप्ता पीएम किसान चा मिळू शकतो.

सोलर पंप योजनेचा कोटा तपासा कशा पद्धतीने तसेच सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा 

1 thought on “या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही, आपले नाव पहा | pm Kisan Yojana”

Leave a Comment