नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस द्वारे विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात परंतु या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे त्यांची माहिती मिळणे गरजेचे आहे व त्यामुळे अशाच प्रकारची एक योजना ज्या योजनेअंतर्गत जवळपास 7 लाख रुपये तुम्हाला 5 वर्षांमध्ये मिळू शकणार आहेत. परंतू ती योजना कोणती आहे? त्यासाठी किती रुपये गुंतवावे लागतील ही संपूर्ण माहिती आपण खालील प्रकारे जाणून घेऊया.
प्रति महिन्याला तुम्हाला काही रुपयांची गुंतवणूक योजनेअंतर्गत करावी लागणार आहे व त्या योजनेचे नाव, पोस्ट ऑफिस आरडी इन्व्हेस्टमेंट स्कीम हे आहे या योजनेअंतर्गत पाच वर्षासाठी पैशाची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला करावी लागणार व त्यानंतर तुम्ही जेवढी गुंतवणूक केलेली आहे त्यानुसार तुम्हाला किती रुपये मिळणार आहे अवलंबून असणार आहे.
एवढी गुंतवणूक केली तर एवढी रक्कम मिळणार:
जर नागरिकांनी प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची गुंतवणूक केली तर जमा होणारी एकूण रक्कम 30 हजार रुपये एवढी असेल, व त्या रकमेवर मिळणारा इंटरेस्ट 5682 रुपये एवढा असणार आहे त्यामुळे मिळणारी पाच वर्षानंतर ची एकूण रक्कम 35,682 रुपये एवढी मिळणार.
त्याचबरोबर जर प्रत्येक महिन्याला पाच वर्षासाठी 2 हजारांची गुंतवणूक केली असता तुमची जमा होणारी रक्कम एक लाख वीस हजार रुपये एवढी असेल तर त्या रकमेवर मिळणारा इंटरेस्ट 22731 रुपये एवढा असणार आहे किंवा पाच वर्षानंतर एकुन 1,42,731 एवढी रक्कम लाभार्थ्याला मिळणार.
याबरोबरच प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये भरले असता पाच वर्षांमध्ये जमा होणारी रक्कम 6,00,000 रुपये एवढी असणार तर त्यावर मिळणारा इंटरेस्ट 1,13,658 रुपये एवढा, म्हणजेच एकूण रक्कम ही 7,13,658 रुपये एवढी मिळणार आहे.
मित्रांनो पोस्ट ऑफिस हे एक विश्वसनीय ब्रँड आहे, आणि सरकारी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकं पोस्ट ऑफीस च्या विविध प्रकारच्या योजना वर विश्वास ठेवून त्यामध्ये नोंदणी करतात, किंवा गुंतवणूक करतात.
पोस्ट ऑफीस अधिक माहिती:
पोस्ट ऑफीस नवनविन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफीस कार्यालयात जाऊन भेट देऊन या बद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. मित्रांनो कोणत्याही योजने मध्ये आपण पैसे टाकण्यापूर्वी त्या योजने बद्दल विस्तृत माहिती जाणून घेतली पाहिजे. ही योजना सर्व पोस्ट कार्यालयात सुरू आहे.
शेत जमिनीची खरेदी करण्याचा विचार आहे? थांबा! जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी