वृद्ध पालक, नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण हल्ली सर्रास आपल्या आई-वडिलांची सोय अथवा त्यांना योग्य वागवणूक मुलांकडून दिली जात नाही, मुले आपल्या आई वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती आपल्या नावावर करून घेतल्यानंतर त्यांना सांभाळण्यास नकार देतात अशा वेळेस त्यांच्या वृद्ध मातापित्यांनी खचून न जाता त्यांना आपल्या मुलाच्या नावावर केलेले खरेदी खत किंवा बक्षीस पत्र रद्द करता येणार आहे कारण पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण कायदा 2007 अंतर्गत ही सर्व प्रक्रिया केली जाणार आहे.
मुले आपल्या आई वडिलांच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करून घेतात व त्यानंतर त्यांना सांभाळण्यास नकार देतात तसेच वेगळी वागणूक सुद्धा त्यांना दिली जाते अशा वेळेस जेष्ठ नागरिकांना आपल्या मुलाच्या नावावर केलेली जमीन पुन्हा मिळवता येणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे पैसा खर्च न करता जर आपली मुले आपल्याला सांभाळत नसतील तर पुन्हा आपल्या नावावर जमीन करणे हा उत्तम पर्याय जेष्ठ नागरिकांकडे असणार आहे.
यासंबंधीची तक्रार प्रांताधिकारी यांच्याकडे करावी लागणार आहे साठ वर्षानंतर मुलांनी आपल्या आई वडिलां सांभाळण्यास नकार दिला असेल तर कितीही वर्षांपूर्वी मुलांच्या नावावर केलेली मालमत्ता रद्द केली जाऊ शकते व आपल्या नावावर केली जाऊ शकते. जर स्वतः कमावलेली मालमत्ता असेल किंवा वडीलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता असेल तर ती जमीन पालकांना परत मिळवता येईल.