शिधापत्रिका धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण काही शिधापत्रिका धारकांना रेशन मिळणार नाही आहे, एक मे पासून काही शिधापत्रिका धारकांना रेशन मिळणे बंद होणार आहे व यासंबंधीची पात्र लाभार्थी यादी ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्यात आलेली आहे व त्यामुळे तुम्हाला जर यापूर्वी मोफत रेशन मिळत असेल तर एक मे पासून मिळणार की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यादी चेक करावी लागणार आहे त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर त्या शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत पुढील पाच वर्षे शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन दिले जाणार आहे व त्यामुळे तुम्हाला यापुढे सुद्धा मोफत रेशन मिळणार का हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे, शिधापत्रिका धारकांना मोठ्या प्रमाणात धान्य चाल दिला जातो त्यामध्ये गहू तांदूळ साखर चणाडाळ तेल या संपूर्ण वस्तु दिल्या जातात व या संपूर्ण वस्तू मोफत असतात.
जर एखाद्या नागरिकाला शिधापत्रिका अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्याला शिधापत्रिका काढण्यासाठी काही पात्रता निकष मध्ये पात्र असणे गरजेचे आहे जसे की तो व्यक्ती भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे तसेच त्या व्यक्तीच्या कुटुंबीयातील सर्व नागरिकांचे आधार कार्ड काढून असावी. तसेच शिधापत्रिका धारक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असणे गरजेचे आहे.
यादीत नाव चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस
1 मे पासून ज्या शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन चा लाभ मिळणार आहे त्यांची यादी अपलोड करण्यात आलेली आहे, ती यादी चेक करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर शिधापत्रिका पात्र लाभार्थी यादी त्यावर क्लिक करा, त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत अशाप्रकारे माहिती निवडा. त्यानंतर रेशन दुकानाचे नाव दिसेल व दिलेल्या क्रमांकावर क्लिक करून तुम्ही शिधापत्रिका धारकांची यादी चेक करू शकता त्यामध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला मोफत रेशन मिळणार आहे परंतु नाव नसेल तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही.
पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला येणार, बघा संपूर्ण माहिती
2 thoughts on “1 मे पासून यांना मोफत रेशन मिळणार नाही? यादीत नाव पहा, नवीन शिधापत्रिका यादी जाहीर | Ration Changes”