मुलांना मिळणार 50 हजार रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती, बघा आवश्यक कागदपत्रे, व लगेच अर्ज करा | Scholarship Scheme

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी विविध प्रकारच्या योजना आहे, त्यातीलच बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 50 हजार रुपये पर्यंतच्या शिष्यवृत्ती चा लाभ दिला जाणार आहे.

 

योजने अंतर्गत बांधकाम कामगाराची मुले अर्ज करून लाभ घेण्यास पात्र आहे व त्यामुळे आवश्यक कागदपत्रे कोणत्या प्रकारची लागणार आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण कशी करायची याबाबत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे व अर्ज प्रक्रियेची संपूर्ण प्रोसेस फॉलो करून अर्ज करता येणार आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

 

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • स्वयंघोषणापत्र
  • शाळेतील 75 टक्के उपस्थिती प्रमाणपत्र
  • बोनाफाईड

 

अर्ज प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस

 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे, त्यानंतर न्यू क्लेम या बटन वर क्लिक करून, नोंदणी क्रमांक टाकून, प्रोसिडे टू फॉर्म या बटणावर क्लिक करून आलेला ओटीपी एंटर करा. शैक्षणिक कल्याण योजना हे ऑप्शन निवडा, दिली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून वरील दिलेली आवश्यक कागदपत्रे योग्य साईजनुसार अपलोड करा व अर्ज सबमिट करा अशाप्रकारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

जर तुम्हाला योजने संदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन भेट द्या.

 

कांदा चाळीसाठी शंभर टक्के अनुदान, आत्ताच अर्ज करा

Leave a Comment