शेतकरी बांधवांनो प्रति महिना 3 हजार पेन्शन मिळणार, श्रम योगी मानधन योजना अंतर्गत करा अर्ज | Shram Yogi Mandhan Yojana

देशामध्ये विविध प्रकारच्या योजना कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात त्यातीलच एक उत्तम योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना होय, या योजनेच्या माध्यमातून व्यक्तीचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला तीन हजार रुपये महिना अशी पेन्शन चालू होते व या पेन्शन द्वारे त्याचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे भागवला जाऊ शकतो परंतु यासाठी काही गुंतवणूक ही पूर्वीच करावी लागते 18 ते 40 वर्षात दरम्यान ही गुंतवणूक केल्यास साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रति महिना तीन हजार रुपये एवढी पेन्शन व्यक्तीला चालू होणार आहे.

 

योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वर्षा दरम्यान लाभार्थी व्यक्तीचे वय असणे गरजेचे आहे व अत्यंत कमी गुंतवणूक करून तीन हजार रुपये महिना प्राप्त केला जाऊ शकतो. त्याकरिता 55 रुपये किंवा 200 रुपये एवढी रक्कम जमा करावे लागेल. लाभार्थ्याचे वय 40 वर्षे एवढे असेल व तेव्हापासून योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असेल तर त्या व्यक्तीला दोनशे रुपये एवढी रक्कम दर महिन्याला जमा करावी लागणार आहे. तसेच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 15 हजारापेक्षा कमी असावे.

 

योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

 

योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे अकाउंट उघडावे लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला महिन्याला रक्कम जमा करावी लागेल व त्यावेळेस तुमचे वय 60 वर्षे पूर्ण होणार अशा वेळेस तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन सुद्धा चालू होणार आहे अशा प्रकारे श्रमयोगी मानधन योजना अत्यंत उपयोगी व फायदेशीर अशी योजना आहे.

 

दूध अनुदानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा, 2 लाख 72 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदान जमा