var litespeed_docref=sessionStorage.getItem("litespeed_docref");litespeed_docref&&(Object.defineProperty(document,"referrer",{get:function(){return litespeed_docref}}),sessionStorage.removeItem("litespeed_docref")); सोलर पंप योजनेचा कोटा तपासा कशा पद्धतीने तसेच सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा | Solar Pamp Yojana - Shetkari Today

सोलर पंप योजनेचा कोटा तपासा कशा पद्धतीने तसेच सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा | Solar Pamp Yojana

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार अंतर्गत विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत अनुदानावर सोलर पंप दिले जाते व त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पाण्याची उपलब्धता होऊ शकते. त्यामुळे तुमच्या शहरातील या तालुक्यांमध्ये सोलार पंपाचा किती कोटा आहे हे तुम्हाला मोबाईलवर सुद्धा चेक करता येणार आहे.

 

प्रधानमंत्री कुसूम सोलार पंप योजना अंतर्गत ओबीसी समाजाच्या नागरिकांना लाभ द्यायचा असल्यास 90% एवढे अनुदान दिले जाते व उर्वरित असलेले दहा टक्के हे शेतकऱ्याला स्वतः खर्च करावे लागते, परंतु अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना 95 टक्के एवढे अनुदान देण्यात उर्वरित पाच टक्के रक्कम स्वतः भरावे लागते.

 

सोलर पंप चा कोटा कसा चेक करायचा?

 

सोलार पंपाचा कोटा चेक करण्यासाठी सर्वप्रथम ऊर्जाच्या वेबसाईटवर जावे, त्यानंतर कुसुम सोलार पंप नोंदणी या पर्यायावर क्लिक करून, त्यानंतर सेल्फ विलेज हे ऑप्शन दिले जाईल, त्यामध्ये जर तुमच्या गावाचे नाव ऍड झालेली असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल परंतु योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल परंतु सेल्फ विलेज मध्ये तुमच्या गावाचे नाव नसल्यास लाभ मिळणार नाही.

 

यादीत नाव नसल्यास तुम्हाला सोलार पंप आहे असे म्हणून नोंदणी करावी लागेल त्यासाठी राज्य जिल्हा तालुका तुमचे गाव प्रवर्ग मोबाईल क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण इथे लिहिलेली माहिती भरावी. त्यानंतर तुमच्या गावात सोलर पंपाचा किती कोटा आहे हे तुम्हाला कळेल.

 

सोलर पंप साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

 

प्रधानमंत्री सोलर पंप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महाऊर्जाच्या वेबसाईटवर जाऊन विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरून नोंदणी सह लॉगीन करून कागदपत्रे अपलोड करून अर्ज करावा लागेल.

 

अधिक माहिती पहा

1 thought on “सोलर पंप योजनेचा कोटा तपासा कशा पद्धतीने तसेच सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा | Solar Pamp Yojana”

Leave a Comment