घरावर सोलर पॅनल बसवून वीज बीलापासून सुटका मिळवा, मिळणार 78 हजार रुपयांचे अनुदान, संपूर्ण माहिती | Solar Panel

देशांमध्ये विविध प्रकारचे योजना राबविल्या जातात त्यातीलच एक योजणा नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेली आहे व ती योजना म्हणजेच पीएम सूर्य घरत मोफत बिजली योजना, या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घरावर सोलर पंप लावता येणार आहे व त्यासाठी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. अनुदानामधून सोलार पॅनल बसवता येईल व मोठ्या प्रमाणात विजेची बचत व वीज बिलापासून सुटका सर्वसामान्य नागरिकांची या योजनेमुळे होऊ शकणार आहे.

 

1 कोटी कुटुंबांना योजनेअंतर्गत लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे. पीएम सूर्यग्रह मोफत बिजली योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज केलेले आहे व अर्ज केलेल्या नागरिकांची संख्या जवळपास एक कोटी एवढी आहे.

अनुदान किती?

पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024 ला करण्यात आलेली होती, त्यामुळे या योजनेअंतर्गत कशाप्रकारे व किती सबसिडी मिळणार आहे हे सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे कारण त्यानुसारच अनेक नागरिक योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकणार आहे, योजनेच्या माध्यमातून किमान 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

 

परंतु यामध्ये वॅट नुसार अनुदान दिले जाईल जर एक किलो वॅट क्षमतेचे सोलर पंप असल्यास तीस हजार रुपये अनुदान मिळणार व, दोन किलो वॅट सोलार पंप क्षमतेचा असल्यास साठ हजार रुपये अनुदान तर तीन किलो बॅट किंवा त्यापेक्षा जास्त सोलार पंप असल्यास 78 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाईल.

 

ज्या नागरिकांनी योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावी जास्त असल्यास पात्र ठरणार नाही. लाभ घेण्यासाठी स्वतःचे घर असेल तरच त्यावर सोलर पंप लावू दिले जाईल म्हणजेच लाभ दिला जाईल. सौर पॅनल बाबतचे अनुदान पूर्वी घेतलेले नसावे व घराला छत असावी.

अर्ज करण्याची लिंक

गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेचा लाभ दिला जाणार आहे, नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पंप घ्यावे लागणार आहे तरच अनुदान मिळेल अशा प्रकारे संपूर्ण अटी संपूर्ण माहिती वरील प्रमाणे देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत बीजली योजना काय आहे अनुदान किती दिले जाते अशा प्रकारची संपूर्ण माहिती वरील प्रमाणे आहे.

 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून, मिळणार 7 लाख रुपये

1 thought on “घरावर सोलर पॅनल बसवून वीज बीलापासून सुटका मिळवा, मिळणार 78 हजार रुपयांचे अनुदान, संपूर्ण माहिती | Solar Panel”

Leave a Comment