सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर, येवढे अनुदान मिळणार | Soyabean Anudan

राज्यातील सोयाबीन उत्पादक (Soyabean Anudan) शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्य शासनाच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत देण्यात येणार आहे व अशा प्रकारची घोषणा कृषी मंत्र्यांनी केलेली आहे, कारण पूर्वीपासून सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र चिंतीत झालेले होते अशा स्थितीमध्ये मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे कोणाचेही लक्ष नसताना विरोधी पक्षांनी उठवलेल्या आवाजावरून आता राज्य शासनाने घेतलेल्या मदत देण्याच्या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला होता त्यामुळे या संबंधीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली असून त्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वितरित होणे अपेक्षित आहे. 

 

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्ष नेत्यांना उत्तर देत असताना माहिती दिली त्यानुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 12 जून पर्यंत मदत मिळणे अपेक्षित आहे या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे वितरण होईल, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये एवढी मदत असणार आहे.

 

शासनाच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत दिली जाईल याकरिता 4000 कोटी रुपये अशी घोषणा करण्यात आलेली होती त्यामुळे आता त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुद्धा फायदा होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशाप्रकारे विरोधी पक्ष नेत्यांनी उठवलेल्या आवाजावर उत्तर देत असताना धनंजय मुंडे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देऊ असे सांगितलेले आहे.

 

कापसाच्या उत्पादनात भरपूर वाढ करण्यासाठी कापूस लागवडीचा योग्य कालावधी कोणता? 

Leave a Comment