सर्वात जास्त पेरले जाणारे या 3 सोयाबीनच्या जाती, शेतकऱ्यांची पसंती असणाऱ्या या प्रमुख जाती पहा | Soyabean Variet

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते व त्यामुळे सोयाबीनचे जर भरगोस उत्पादन शेतीमधून काढायचे असेल तर त्यातील सर्वात उत्तम बाब म्हणजे, सोयाबीनचे वाण योग्य प्रकारे व जमिनीनुसार निवडणे अत्यंत गरजेचे आहे कारण शेती करत असताना ती कोणत्याही पिकाची असो त्याकरिता चांगले वाण निवडणे गरजेचे असते, कारण निवडलेल्या वाना नुसारच पिकाचे उत्पादन अवलंबून असते त्यामुळे सोयाबीनची लागवड करत असताना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवायचे असेल तर सोयाबीनच्या जास्तीत जास्त मागणी असलेल्या व चांगल्या वाणाची निवड शेतकऱ्यांनी करायला हवी.

 

या 3 सोयाबीनच्या जातींची निवड करा

 

केडीएस 992

 

के डी एस 992 या सोयाबीनच्या जातीला महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे मोठ्या प्रमाणात या वाणाची निवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते, महाराष्ट्र मध्ये फुले दूर्वा असे नाव या जातीला देण्यात आलेले असून याच नावाने ही जात ओळखली जाते. या जातीचे सोयाबीनचे दाणे टपोरे असून भरगोस प्रमाणात उत्पादन देते, 100 ते 105 दिवसांमध्ये हे वानपरिपक्व बनते अशाप्रकारे ही जात अत्यंत चांगली आहे.

 

केडीएस 726

 

या केडीएस 726 जातीला महाराष्ट्रात फुले संगम या नावाने ओळखले जाते तसेच गेल्या काही वर्षांपासून सर्वात जास्त मागणी फुले संगम या जातीला होत आहेत कारण या वानाची लागवड ही टोकन पद्धतीने केली जाते व मोठ्या प्रमाणात उत्पादन या वानात सोयाबीनचे होते टपोरे दाणे व आकर्षक असे हे वाण आहे. 100 ते एकशे पाच दिवसांमध्ये येण्याचा कालावधी या वाणाचा असून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या वाणाला मागणी वाढलेली आहे.

 

ग्रीन गोल्ड 3444

 

ग्रीन गोल्ड 3444 या जातीला मोठी मागणी असून या जातीची वाने मोठ्या प्रमाणात फुलधारणा धरतात म्हणजेच लहान व लांबट आकाराची पाने या जातीची असून बुडापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत असल्याने मोठ्या प्रमाणात फुलधारणा धरण्यात मदत होते व चार दाण्याची एक शेंग मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे उत्पादनात सुद्धा भर पडते. 95 ते 100 दिवसांमध्ये येणारे हे वाण आहे.

टीप: कोणत्याही शेतकरी बांधवांना आम्ही हे वान वापरण्याचा सल्ला देत नाही, ही पोस्ट फक्त माहिती साठी आहे.

शेतकरी बांधवांनो प्रति महिना 3 हजार पेन्शन मिळणार, श्रम योगी मानधन योजना अंतर्गत करा अर्ज 

2 thoughts on “सर्वात जास्त पेरले जाणारे या 3 सोयाबीनच्या जाती, शेतकऱ्यांची पसंती असणाऱ्या या प्रमुख जाती पहा | Soyabean Variet”

Leave a Comment