एप्रिल महिना अगदी काही दिवसांमध्ये संपणार व त्यानंतर शेतकऱ्यांची टोमॅटोची लागवड करण्याची घाई अधिक वाढणार आहे कारण राज्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन सुद्धा घेतल्या जाते व त्यामुळे टोमॅटो हा एक महत्वपूर्ण घटक आहे व या कालावधीमध्ये अनेक शेतकरी टोमॅटो लागवडीची लगबग करत आहे परंतु शेतकऱ्यांना टोमॅटोचे भरघोस उत्पादन काढायचे असेल तर योग्य टोमॅटोच्या वाणाची निवड करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
शेतकरी नर्सरी मध्ये अथवा स्वतः टोमॅटोची रोपे तयार करतात परंतु हे करत असताना टोमॅटोची वाण कोणते निवडावे यामधून शेतकऱ्याला भरघोस उत्पादन मिळेल भरपूर नफा मिळेल हे आपण बघूयात कारण ज्याप्रमाणे प्रत्येक पिकासाठी चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर योग्य वाण निवडणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे टोमॅटोचे सुद्धा आहे. टोमॅटोच्या अशा तीन जाती आहेत त्यामधून शेतकरी भरघोस उत्पादन मिळू शकतो.
ही आहे सर्वोत्कृष्ट टोमॅटोची वाणे;
1. फुले राजा टोमॅटो वाण:
फुले राजा टोमॅटो वान हे एक सर्वोत्कृष्ट टोमॅटो वाण आहे तसेच या वाणांमधून हेक्टरी 60 क्विंटल एवढे टोमॅटोचे उत्पादन काढता येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉफिट शेतकऱ्यांना या वाणाची लागवड करून मिळवता येईल अशा वाणाची निवड केली असता अर्थातच शेतकऱ्यांचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडेल. तसेच हे वान 180 दिवसांमध्ये परिपक्व होते. तसेच हे वान विषाणूजन्य रोगास प्रतिकार सुद्धा करते.
धनश्री टोमॅटो वाण:
धनश्री टोमॅटो वान हेक्टर 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्याला काढून देतो तसेच आकार मध्यम असा असून, 160 ते 165 दिवसांमध्ये हे वान परिपक्व बनते, तसेच विविध प्रकारच्या रोगास प्रतिकार सुद्धा हे वाण करू शकते, त्यामुळे धनश्री टोमॅटो वान शेतकऱ्यांना अत्यंत उत्कृष्ट व जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे एक वाण आहे.
फुले केसरी टोमॅटो वाण:
फुले केसरी टोमॅटो वाना पासून हेक्टरी 55 ते 57 क्विंटल एवढे उत्पादन निघाले जाऊ शकते, तुम्ही जर खरीप हंगामात टोमॅटो लागवडीचा विचार करत असाल तर फुले केसरी टोमॅटो वन तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरणार आहे या वानाचे नाव टोमॅटो केसरी थोड्या रंगाची असल्यामुळे फुले केसरी टोमॅटो वाण असे ठेवण्यात आलेले आहे.
या सर्व टोमॅटो च्या वाना बद्दल माहिती आपण जाणून घेतली आहे. अनेक वेळा ही वाने वेगवेगळ्या शेतात वेगवेगळी उत्पन्न मिळवून देतात. याला हवामान तसेच जमिनीचा पोत अश्या पद्धतीने अनेक गोष्ठी कारणीभूत असतात. त्यामुळे कोणतेही वान निवड करण्यापूर्वी स्वतः चौकशी किंवा अधिक माहिती जाणून घेतली पाहिजे.