तुरीचे दर 11 हजार पार, अभ्यासकांच्या मते तूर दरवाढीचा अंदाज | Tur Bajar Bhav 

अनेक शेतकऱ्यांकडे तूर आहे तसेच राज्यामध्ये अनेक शेतकरी तुरीचे उत्पादन घेतात, तसे सांगा माझ्या सुरुवातीपासूनच यावर्षी तुरीला चांगला दर मिळताना दिसतो तसेच सध्याच्या स्थितीमध्ये 11000 चा टप्पा तुरीने पार केलेला आहे म्हणजेच बारा हजारांच्या उंबरठ्यावर तूर उभी आहे. सरासरी दराचा विचार करायचा झाल्यास 11000 रुपये एवढा दर तुरीला मिळतोय. सध्याच्या स्थितीमध्ये तुरीचे दर टिकून आहे तसेच पुढील काळामध्ये सुद्धा हे दर टिकून राहण्याची शक्यता आहे. 

 

अनेक शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केलेली आहे परंतु सध्याच्या स्थितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात विविध राज्यांमध्ये कमी झालेली आहे एवढेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुरीची आवक बाजार समितीमध्ये कमी होताना दिसते, व याचाच एक प्रकारचा फायदा तूर दराला होणार आहे परंतु पुढील एक ते दीड महिना तुरीच्या दरातील सुधारणा ह्या मर्यादित राहू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

जर शेतकऱ्यांनी तुरीचे दर वाढतील या आशेने तुरीची साठवणूक केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना 12000 रुपयापर्यंतचा दर तुरीला मिळू शकतो असा अंदाज आहे, तसेच यावर्षी तुरीची टंचाई सुद्धा जाणवली जात आहे अशा प्रकारची स्थिती अभ्यासकांनी तूर दराबाबत वर्तवली आहे यावरूनच योग्य वेळेवर शेतकऱ्यांनी तूर विक्रीचे नियोजन करावे.

शेतकरी मित्रांनो हा एक अंदाज आहे, बाजारभाव वर अनेक घटक परिणाम करत असतात. त्यामुळे येत्या काळात शासनाचे धोरण तसेच बाजारातील आवक, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी या सर्व बाबी बाजारभाव ठरवत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचा शेतमाल साठवून ठेवणे पूर्वी या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

तूर या पिकांचे बाजारभाव सुरुवाती पासून चांगले होते, परंतु आता तेवढ्यात तुरीला योग्य व चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी सुद्धा अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचा शेतमाल विकला आहे.

सोयाबीनचे दर कधी वाढणार? या बाजार समिती सोयाबीनला मिळाला एवढ्या रुपयांचा दर, विविध बाजार समितीतील आजचे सोयाबीन दर 

Leave a Comment