सर्व सामान्य मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाईल, त्याच्यामध्ये बेरोजगार तरुणांची व तरुणी ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व अशा स्थितीमध्ये त्यांना एक प्रकारे आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा याकरिता भांडवलाची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे वसंतराव नाईक कर्ज योजनेच्या माध्यमातून व्यवसाय चालू करण्यासाठी एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. त्यामुळे योजनेअंतर्गत असणारी पात्रता काय आहे कोणकोणत्या व्यवसायासाठी ही योजना लागू आहे व आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा या पद्धतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज व गट कर्ज दिले जाते व कोणकोणत्या व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे हे समजून घेणे गरजेचे आहे कारण या व्यवसाया व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यवसायासाठी वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही त्यामुळे तुम्ही चालू करत असलेला व्यवसाय योजनेमध्ये समाविष्ट असणे गरजेचे आहे.
योजनेच्या माध्यमातून तरुण मुले व मुली यांना व्यवसायासंबंधीचे प्रशिक्षण सुद्धा योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे, निराधार, विधवा महिलांना योजनेच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येऊन, योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे व काही आवश्यक कागदपत्रे अर्जदाराकडे उपलब्ध असावी तसेच दोन हप्त्यांमध्ये कर्जाचे वितरण केले जाईल.
वसंतराव नाईक कर्ज योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जाचा लाभ दिला जाणार आहे, ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांचे वय 18 ते 55 वर्षा दरम्यानचे असावी. आधार लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील अर्ज करताना सादर करणे महत्त्वाचे ठरणार आहे, वार्षिक उत्पन्न अर्जदाराचे एक लाखापेक्षा कमी असावे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
वडापाव विक्री केंद्र,भाजी विक्री केंद्र,ऑटोरिक्षा,चहा विक्री केंद्र,सॉफ्टटॉईज विक्री केंद्र,डी. टी. पी. वर्क,स्विट मार्ट,ड्रायक्लिनिंगसेंटर,हॉटेल,टायपिंग इन्स्टीट्युट,ऑटो रिपेअरींगवर्कशॉप,मोबाईल रिपेअरिंग,गॅरेज,फ्रिज दुरूस्ती,ए. सी. दुरुस्ती,चिकन शॉप,मटन शॉप,इलेक्ट्रिकल शॉप,आईस्क्रिम पार्लर, मासळी विक्री,भाजीपाला विक्री, फळ विक्री,किराणा दुकान,आठवडीबाजारामध्ये छोटसे दुकान,टेलिफोन बुथ,अन्य तांत्रिक, लघु उद्योग.मत्स्य व्यवसाय,कृषी क्लिनिक,पॉवर टिलर,हार्डवेअर शॉप,पेंट शॉप,सायबर कॅफे,संगणक प्रशिक्षण,झेरॉक्स,स्टेशनरी,सलुन,ब्युटी पार्लर,मसाला उद्योग,पापड उद्योग,मसाला मिर्ची कांडप उद्योग अशा प्रकारचा व्यवसायाचा समावेश योजनेअंतर्गत होणार आहे हा व्यवसाय करणारी नागरिक किंवा व्यवसाय चालू करू इच्छिणारी नागरिक कर्जाचा लाभ घेऊ शकतात
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- बँक बुक
- शपथपत्र
- जातीचा दाखला
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी वसंतराव नाईक कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरून वरील लिहिलेली संपूर्ण गरजेची असलेली आवश्यक कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर तुमचा व्यवसाय निवडा व त्यानंतर अर्ज सबमिट करा अशा प्रकारे तुम्हाला अर्ज प्रक्रिया अगदी सहजरीत्या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.
घरावर सोलर पॅनल बसवून वीज बीलापासून सुटका मिळवा, मिळणार 78 हजार रुपयांचे अनुदान, संपूर्ण माहिती